● तालुक्यात शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त
सुनील पाटील | राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. उमरखेड तालुक्यातील काही भागात लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. शेतकऱ्यांचे रब्बीतील अखेरचे स्वप्न उध्वस्त झाले. शनिवार दि. 18 मार्चला दुपारी झालेली गारपीट नैसर्गिक ‘आतंक’ असल्याचे दिसून आले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. गहू, हरभरा, लिंबू, संत्रा, केळी या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत, विविध पिके धोक्यात आली आहे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी, दिवट पिंपरी, खरुस व अन्यत्र दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. चक्क लिंबाच्या आकारा एवढी गार पडल्याचे दिसून आले.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने दमदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर काही भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आज तर उमरखेड तालुक्यात नैसर्गिक आतंक बघायला मिळाले.
वणी: बातमीदार