● 3 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
रोखठोक | वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोपटाळा शिवारात कोंबड्याच्या झुंजी लावून हार जीत केल्या जात होती. पोलिसांनी रविवार दि. 19 मार्चला दुपारी दोन वाजता धाडसत्र अवलंबले. यावेळी पाच जुगाऱ्याना ताब्यात घेत 9 दुचाकी, 4 कोंबडे, रोकड तीन हजार असा 3 लाख 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संतोष चिंदुजी होलके (35) रा. वागदरा, अजय विठ्ठल कापसे (51) रा. वणी, अक्षय अंबादास झाडे (22) रा. मंदर, अलीशा चंदुशा (53) रा. शास्त्री नगर, राजेंद्र शामराव विधाते (54) रा. पेटुर असे ताब्यातील जुगाऱ्यांची नावे आहेत. ते कोंबड्याच्या झुंजी लावून हार जीत करत होते.
भालर जवळील धोपटाळा जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली. त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी पोलीस उप निरीक्षक प्रवीण हिरे यांना आदेशीत करत धाडसत्र अवलंबण्यास सांगितले.
भालर मार्गावरील धोपटाळा जंगलात पोलिसांनी शिरकाव केला. काही इसम गोलाकार रिंगण करून कोंबड्याच्या झुंजी लावून हार-जीत करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लगेचच धाडसत्र अवलंबत त्या सर्व जुगाऱ्याना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक प्रवीण हिरे, वसीम शेख, महेश बोधलकर, भानुदास हेपट यांनी केली.
वणी: बातमीदार