Home Breaking News श्री क्षेत्र पुनवट येथे गुढीपाडवा महोत्सव

श्री क्षेत्र पुनवट येथे गुढीपाडवा महोत्सव

400

विविध कार्यक्रमाची मेजवानी

तुषार अतकारे | तालुक्यातील श्री क्षेत्र पुनवट येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री अवधूत महाराजांचा त्रिदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधी परंपरेनुसार आयोजित महोत्सवात भाविक भक्तांना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.

महोत्सवाची सुरुवात दि. 20 मार्चला ग्रामस्वच्छता अभियानाने होणार आहे. त्यानंतर येथील पूजनीय श्री अवधूत महाराजांची, तारा माता, गंगा मातेची महाआरती होणार आहे.

मंगळवार दि. 21 मार्चला तहसीलदार निखिल धुळधर, तर बुधवार दि. 22 मार्चला शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते महाआरती व अभिषेक होणार आहे. तसेच दि. 21 मार्चला सत्यपाल महाराजांचे शिष्य उदयपाल महाराज यांचे खंजेरी भजन होणार आहे.

बुधवारी गुढीपाडव्याच्या दिवशी पालखी सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी परिसरातील हजारो भाविक व भजनी मंडळ सहभागी होणार आहे. बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन येथील यशराज क्रिटिकल केअर होमिओपॅथी क्लीनक चे डॉ. राज कृष्णाजी मडावी व पुनवट येथील ग्रामस्थांनी केले आहे.
वणी: बातमीदार