● हरवलेल्या मुलीला शोधण्याचे आर्जव
● ठाणेदारांनी जपली माणुसकी
सुनील पाटील | घरात अठरा विश्व दारिद्र, पोटाची खळगी भरावी म्हणून मिळेल ते काम करणारा परिवार, त्यातच त्यांची मुलगी हरवली, तिला शोधण्याचे आव्हान त्या परिवारासमोर उभे ठाकले. जिथे ते काम करत होते त्या कंत्राटदाराने कामाचा मोबदला दिला नाही. उपाशीपोटी हरवलेल्या मुलीला शोधण्याचे आर्जव करणाऱ्या त्या परिवाराकडे बघून पोलिसातील माणूस जागा झाला.
मंगळवारी एक हताश परिवार हरवलेल्या आपल्या मुलीला पोलिसांनी शोधावं यासाठी पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी आस्थेने त्यांची विचारपूस केली, भुकेने ते कासावीस झाल्याचे दिसून येत होते. त्यांनी आपली अपबीती कथन करताच ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचे मन गहिवरले.
सिया बानो रफिक उल्ला सयद असे त्या अभागी मातेचे नाव आहे. ती तक्रार दाखल करण्यासाठी लहानग्या चिमुकल्यासह ठाण्यात आलेली होती. अतिशय गरिबी, त्यातच ठेकेदाराने कामाचे पैसे दिले नाहीत तर त्याचा मोबाईल नंबर देखील त्यांचे जवळ नाही. अशा कठीण प्रसंगी ठाणेदाराने त्यांना अन्न धान्य देऊन समाजभान जपले तसेच मुलीला शोधण्याचे आश्वस्त केले.
वणी : बातमीदार