Home Breaking News झुलेलाल जयंती, उत्साह, जल्लोष आणि नववर्षाचे स्वागत

झुलेलाल जयंती, उत्साह, जल्लोष आणि नववर्षाचे स्वागत

403

भव्य रॅलीने दणाणले शहर

रोखठोक | सिंधी समाजाचा मुख्य सण ‘चेटीचंद’ मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. हा सण सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान ‘झुलेलाल’ यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. येथील सिंधी समाज बांधवांनी गुरुवार दि. 23 मार्चला भव्यदिव्य रॅली काढून उत्साह, जल्लोष आणि नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात केले.

वणी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी सिंधी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. रॅलीचे नेतृत्व चंद्रकांत फेरवानी, भगवान सेठ तरुणा, विनोद वाधवानी, तोलारामजी नानवानी, शंकर नागदेव, चेतनसेठ नागदेव, दीपचंद नानवाणी, राजकुमार अमरवाणी, शंकर नागदेव, तुलसीदास सुंदरी यांनी केले.

सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती म्हणजेच सिंधी समाजाच्या नवीन वर्षाची सुरुवात असे समजल्या जाते.भगवान झुलेलाल यांचा जन्म सद्भावना आणि बंधुभाव वाढवण्यासाठी झाला. यामुळे सिंधी समाजबांधव या पावनदिनी पूजा-अर्चा करून भव्य रॅली काढतात. तसेच या दिवशी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत संपूर्ण सिंधी समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते. या महत्वपूर्ण उत्सवाच्या यशस्वीतेसाठी रवी फेरवानी, दिनेश नानवानी, विनोद आसवानी, रितेश चुगवानी, गुरमुख भवनानी, संजय नानवानी, संतोष चुगवानी, योगेश नानवानी, राजेश नागदेव, सुमित नानवानी, केसवानी, विकी फेरवानी, मुरली केसवानी, श्याम नानवाणी व समाजबांधवानी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार