● वारकऱ्यांचे भजन आणि पारंपारीक वाद्याचा गजर
● रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीचे आयोजन
रोखठोक | वणी शहरात मागील अनेक वर्षापासुन प्रभु श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने दि. 30 मार्चला भव्यदिव्य शोभायाञेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रमुख आकर्षण साडेदहा फुट उंचीचे हनुमानजी असणार आहे.
वणी शहरातील, जुन्या स्टेट बँकेजवळील श्रीराम मंदिरातुन प्रभु श्रीरामाची शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत अश्व, बँड पथक, लेझीम, भजन, लाऊड स्पिकर व इतर पौराणीक देखावे सुद्धा राहणार आहे. विशेष म्हणजे हरियाना येथील साडेदहा फुट उंचीचे हनुमानजीचे दर्शन भाविक भक्तांसाठी पर्वणी असणार आहे. त्याप्रमाणेच श्रीक्षेत्र शेगांव देवस्थानातील वारकरी ‘भजन’ हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
शोभायात्रा जुन्या स्टेट बँके जवळील राम मंदिरातुन सायंकाळी 4 वाजता चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षेत्र कळंब देवस्थानचे, अध्यक्ष अँड.संतोष कुचनकर यवतमाळ यांच्या हस्ते रथाचे पुजन होणार आहे. त्यानंतर भव्य शोभायात्रा निघणार आहे.
शोभायात्रा मोठी कमान चौक, शाम टॉकीज चौक, भारतमाता चौक, दिपक टॉकीज चौक, काठेड ऑईल मिल ते गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक , टागोर चौक , टुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक , महाराष्ट्र बँक चौक ते राममंदिर परत हया मार्गाने ही शोभा यात्रा निघणार असुन रात्री 10 वाजता राममंदिर येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे.
श्री प्रभु रामचंद्राच्या शोभायात्रेत मोठया प्रमाणात रामभक्तांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर वणी यांनी केले आहे.
वणी: बातमीदार