Home Breaking News Accident… ट्रक व ऑटो चा अपघात, माय-लेक ठार

Accident… ट्रक व ऑटो चा अपघात, माय-लेक ठार

5600

आबई फाटा परिसरातील घटना

रोखठोक | वणी वरून शिंदोला येथे प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटोला भरधाव येणाऱ्या ट्रक ने जबर धडक दिली. या भीषण अपघातात माय-लेक ठार झाल्याची घटना गुरुवार दि.6 एप्रिल ला 4:30 वाजता घडली. An auto carrying passengers was hit by a speeding truck.

संजीवनी अनंत नागतुरे (35) व अवनी अनंत नागतुरे (5) असे अपघातात ठार झालेल्या माय- लेकीचे नाव आहे. ते कुर्ली या गावातील निवासी आहेत. ऑटोने गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

वणी येथून सात ते आठ प्रवाशी ऑटो क्रमांक MH- 29- AM- 0013 मध्ये बसून शिंदोला येथे जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणारा ट्रक क्रमांक HR-58 -C – 0482 ने चक्क ऑटोला उडवले. अपघात प्रचंड भीषण होता.

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली, जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले तर पोलिसांना सूचना दिली. या घटनेत माय- लेक ठार झाली असून तीन महिला व तीन पुरुष जखमी झाले आहेत. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
वणी: बातमीदार