Home Breaking News अन्यथा…. अशुध्द पाणी, अधिकाऱ्यांच्या दारी

अन्यथा…. अशुध्द पाणी, अधिकाऱ्यांच्या दारी

● पालीकेला मनेसेचा अल्टीमेटम

655
Img 20241016 Wa0023

पालीकेला मनेसेचा अल्टीमेटम

रोखठोक | शहरात होत असलेल्या दूषित, दुर्गधीयुक्त व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. तात्काळ शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अन्य‍था नदीचे “अशुध्द पाणी अधिकाऱ्यांच्या दारी” ही मोहीम राबविण्यात येईल असा अल्टीमेटम शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला आहे. MNS has become aggressive due to the supply of contaminated, smelly and impure water in the city.

वणी शहरात मागील काही महिन्यापासुन अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. याप्रकरणी नागरीकांत संतप्त भावना निर्माण होत असुन पालीका प्रशासन माञ ढिम्म असल्यााचे सकृतदर्शनी दिसत आहे. शहरात अतिशय महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी कार्यान्वित केली होती. त्या योजनेचा बट्ट्याबोळ प्रशासनाच्या कार्यप्रणालीमुळेच झाल्याचे बोलल्या जात आहे.

शहरातील काही भागात गढूळ, अशुध्द, दुर्गंधीयुक्त व अळया असलेला पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात प्राप्त झाल्याने मनसेने आपला आक्रमक पाविञा अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील जल शुध्दीकरण केंद्र मृतावस्थेत आहे, भुमीगत पाणी पुरवठा पाईप लाईन जीर्णावस्थेत आहे. पाणी शुध्‍द करण्याची प्रक्रियाच ढेपाळलेली असल्याचा आरोप करत होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनातुन स्पष्ट करण्याात आले आहे.

शहरात अशुध्द व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक व गृहिणींना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी या अतिशय गंभीर प्रकरणी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा “नदीचे पाणी अधिकाऱ्यांच्या दारी” ही मोहिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिका प्रशासना विरोधात राबवेल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.

MNS NIVEDAN
MNS NIVEDAN

याप्रसंगी गितेश वैद्य, आजीद शेख, लकी सोमकुंवर, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, श्रीपाद धोटे, सारंग चिंचोळकर, युनीस खान, अंकीत पिदुरकर, त्र्यबंक ढोरे, सौरभ धांडे, सोरभ लांडे सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी : बातमीदार