● सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये पदवी दिवस साजरा
रोखठोक | स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये दि. 12 एप्रीलला पदवी दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी UKG या वर्गातून पाहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयुष्यातील पहिली पदवी घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.There was a different joy on the faces of the students while getting their first degree in life.
आयोजित पदवी दिवस कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात छोट्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. UKG च्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विविधरंगी पोशाख परिधान करून या चिमुकल्यांनी नृत्य, गीत गायन व गिटार वादन प्रभावीपणे सादरीकरण केले.
कार्यक्रमांच्या सुरवातीला माता सरस्वती यांचे प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संस्थापक प्रदीप बोनगीरवार व व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगीरवार यांनी विद्यार्थ्यातील कलागुणांचे कौतुक केले. तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या उपक्रमांची प्रशंसा केली तर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समर्पण वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य प्रवीण दुबे यांनी पालकांशी संवाद साधत पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्याच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मनात काय चालू आहे, हे ओळखून त्यांच्याशी वागावे, अशाने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एक घट्ट नाते तयार होउन मुलं मन मोकळं करु शकतील असे वातावरण निर्माण करण्याचे तसेच मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन खुशबू तोडसाम व मुस्कान शेख तसेच आभार प्रदर्शन पलक शिरभाते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.
वणी: बातमीदार