● मोहमाच, सडवा असा 29 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
रोखठोक | यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव- मादणी शिवारात अवैद्य गावठी दारू गाळण्यात येत होती. याबाबतची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाडसत्र अवलंबले असता एका आरोपीला ताब्यात घेत 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला व हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवार दि. 11 एप्रिलला करण्यात आली. After receiving confidential information, the police resorted to raids and arrested one of the accused
कैलास लक्ष्मण मारबते (50) रा. बोरगाव असे ताब्यातील आरोपींचे नाव आहे. गावठी दारू गाळण्याचे काम करत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. बोरगाव शिवारात गावठी दारूची हातभट्टी जोमात सुरू असल्याची गोपनीय माहिती PSI पांडुरंग कवरासे यांना मिळाली होती.
यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पांडुरंग कवरासे, PSI सुजाता मनवर, पोहवा पोलपेल्लीवार, पोहवा मालकर, पोकों गोडंबे यांनी बोरगाव मादणी शिवारातील नाल्याच्या काठावर झाडाझुडुपात धगधगत असलेल्या हातभट्टी वर धाड टाकली. तेथे उपस्थित असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
घटनास्थळी भट्टी वर असलेला एक लोखंडी ड्रम, त्यावर मोठे जर्मनचे मोठे टोपले झाकलेले होते तर रबरी नळी लावुन दारू गाळण्यात येत होती. यावेळी मोहमाच सडव्याने भरलेले 6 निळे रंगाचे प्लास्टीक ड्रम व अन्य साहित्य पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. मोहमाच सड़वा, 10 लिटर हातभट्टी गावठी दारु, ड्रम असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार