● संपर्क साधावा असे आवाहन
रोखठोक | शिरपूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात असलेल्या बेवारस स्थितीतील 51 वाहनाचा लिलाव 25 एप्रिल ला होणार आहे. याप्रसंगी लिलावात सहभागी व्हावे असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे. The auction of the abandoned vehicle in Shirpur police station premises will be held on April 25.
उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्या आदेशाने लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी प्रथमतः नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. ASI प्रवीण गायकवाड ( 9834524908) यांचे सोबत दि 25 एप्रिलला सकाळी 9 ते 10:30 पर्यंत संपर्क साधावा लागेल.
बेवारस असलेल्या 51 वाहनांपैकी 2 चारचाकी तर 49 दुचाकींचा समावेश आहे. लिलाव प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यावेळी लिलावात सहभागी होणाऱ्यांना अटी व शर्थी चे पालन करावे लागणार आहे. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्यांचे वाहन असेल किंवा आक्षेप असल्यास नोंदवावा. वणी: बातमीदार