● आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश
● चिखलगांव व रेल्वे सायंडीग जवळ होणार उड्डाणपुल
रोखठोक | वणी शहरातील अतिशय महत्वपुर्ण असलेल्या दोन ठिकाणी केंद्र शासनाच्या “सेतू बंधन” उपक्रमांतर्गत रेल्वे उड्डाणपूलाला मान्यता देण्यात आली आहे. (The railway flyover was approved) याकरीता दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावीत निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांचे कडे दोन वर्षापासुन केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. MLA Sanjeevreddy Bodkurwar’s pursuit of Union Minister Nitin Gadkari since two years has been successful.
शहरालगत असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिखलगांव जवळच्या रेल्वे गेट नं 855/100-200 LC क्रमांक 2B व रेल्वे गेट करंजी वणी घुग्गुस रोडवर ROB चे बांधकाम MSH-14 Ch. 38/309 वणी तालुका जि. यवतमाळ गेट क्रमांक 855/100-200 LC क्रमांक 3AB/ 3T अशा दोन उड्डाण पुलाचे काम तातडीने मार्गी लागणार असुन अवघ्या काही दिवसातच भुमीपुजन अपेक्षीत आहे.
प्रस्तावीत उड्डाण पुलाची वणी शहरात नितांत गरज होती, अतिशय रहदारी चे हे मार्ग असुन या दोन्ही ठिकाणी टि पॉईंट असणार आहे. चिखलगांव जवळच्या उड्डाण पुलावरुन मुकूटबन कडे तर रेल्वे सायडींग जवळच्या उड्डाण पुलाजवळून वणी शहरात येण्याचा मार्ग उड्डाण पुलावरुन असणार आहे.
केद्रीय मंञी, रस्ते वाहतुक व महामार्ग, यांचे तांञीक सल्लागार बी. डी. ठेंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना पञ पाठवून सेतू बंधन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपूलांची प्रस्तावित कामे कोणत्या रस्त्यावर आहेत याची खातरजमा करून सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत का याबाबत खातरजमा करण्यात यावी असे सुचवले आहे.
वणी शहरात ये-जा करण्यासाठी विना अडथळा मार्गक्रमण व्हावं याकरीता उड्डाण पुलाची मागणी अनेक दिवसापांसुन वणीकर नागरीक करत होते. त्यातच आ. बोदकुरवार यांनी मतदार संघातील तब्बल सहा उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांना पञ देत पाठपुरावा केला असता दोन ठिकाणी केंद्र शासनाच्या “सेतू बंधन” उपक्रमांतर्गत रेल्वे उड्डाणपूलाला मान्यता देण्यात आली आहे.
वणी: बातमीदार