● तिसऱ्या गटाचे नेतृत्व कोण करणार…!
रोखठोक | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका बऱ्याच कालावधीनंतर होत आहे. निवडणुक रिंगणात उतरण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी जय्यत तयारी केल्याचे दाखल नामनिर्देशन पञावरुनच स्पष्ट झाले आहे. गुरूवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चिञ स्पष्ट होणार असुन महाविकास आघाडी व भाजपातच तुल्यबळ लढत होणार की तीसरा गट निवडणुक रिंगणात उतरणार याकडे पुढाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. There are indications that the APMC election will be very tight
बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातच वणीची बाजार समिती रग्गड समजल्या जाते. उत्पन्नाचा स्ञोत निर्माण करणारे शेकडो दुकानगाळे लिलावाच्या प्रतिक्षेत आहे. निवडणुकीनंतर येणारे संचालक मंडळ विकासाभिमुख पविञा अवलंबणार असल्याचे भाकीत करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांची लुट होणार नाही याची दक्षता माञ घ्यावी लागणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची नियमीत मुदत 14 जुलै 2021 ला संपली होती. शासनाने संचालक मंडळाला एक वर्ष मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर 15 जुलै 2022 पासुन बाजार समितीचा गाडा प्रशासक हाकताहेत. या दरम्यान बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपये थकवल्याचा प्रकार पुढे आला होता. यामुळे बाजार समितीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्याचे नाकारता येत नाही.
बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळायला लागले असुन भाजपा आणि महाविकास आघाडीत तुल्यबळ सामना रंगणार आहे. 18 जागेसाठी 94 अर्ज दाखल झाले होते त्यातील केवळ दोन अर्ज मागे घेण्यात आले आहे. गुरुवार दि. 20 एप्रील ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. किती उमेदवार उमेदवारी मागे घेणार हे स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच खरी रणनिती राजकीय धुरंधर ठरवणार आहेत.
भाजपा आणि शिवसेनेची या निवडणुकीत युती असेल असे स्पष्ट करण्यात आले असुन शिवसेनेला किती जागा देणार हे गुपीत अद्याप उलगडले नाही. तर महाविकास आघाडीतील घटक कॉग्रेस व शिवसेना उध्दव ठाकरे गट हे प्रबळ आहेत तर राष्ट्रवादी कॉग्रेसचा फारसा प्रभाव नाही. यामुळे माजी आमदार विश्वास नांदेकर व माजी आमदार वामनराव कासावार हे समन्वयाने उमेदवार रिंगणात उतरवतील असे चिञ दिसत आहे. तिसरा गट निर्माण झाल्यास त्या गटाचे नेतृत्व कोण करणार यावर सुध्दा निवडणुकीचे गणित अवलंबुन आहे.
वणी: बातमीदार