● पक्षीय रणनीती आखून सावरण्याचा प्रयत्न
रोखठोक | भाजपने येणारी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी आरंभली आहे. येनकेन प्रकारे निवडणूक जिंकायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यातच पक्षांतर्गत केलेले सर्व्हेक्षण विरोधाभास निर्माण करणारे येत असल्याने उद्दीष्ट गाठता येणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील भाजपाचे पाच पैकी काही आमदार डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा होत असल्याने ते आमदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Some of the five BJP MLAs in the district are in the danger zone
भारतीय जनता पार्टी तल्लख बुद्धिमत्तेचा राजकीय पक्ष आहे. सत्ताकारण हेच सूत्र त्यांनी जोपासले असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 150 जागा निवडून आणण्याचे उदिष्ट त्यांनी जाहीर केले आहे. त्यातच त्यांनीच केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील 33 आमदारांच्या जागा डेंजर झोन मध्ये असल्याचा कथित अहवाल आणि होणारी चर्चा भांबावून सोडणारी आहे.
जिल्ह्यातील भाजपचे पाच आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यातील दोन आमदार डेंजर झोन मध्ये असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. त्यांना पक्षीय नेतृत्वाने विविध सूचना केल्या असून परिस्थिती सुधारण्यासाठी रणनीती आखून दिली आहे.
राज्यात भाजपचे टेन्शन वाढवणारी एक बातमी काही दिवसापूर्वी समोर आली होती. येत्या विधानसभा निवडणुकीत 2019 च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल समोर आला असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित होत होत्या. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली. मात्र हा अहवाल कोणी आणि कधी तयार केला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तिघांची स्थिती सध्यस्थीतीत उत्तम आहे. त्यांनी प्राप्त निधींचा पुरेपूर वापर केला आहे. कधीनव्हे तेवढा निधी खेचून आणला आहे यामुळे त्यांच्या बाबत मतदारसंघात नकारात्मक चर्चा नाही. परंतु कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करावी लागणार आहे. सोबतच प्रसार माध्यमाचा योग्य वापर करावा लागणार आहे.
● डेंजर झोन मधील आमदारांचे प्रसिद्धी तंत्र ●
पक्षांतर्गत सर्व्हे झाल्यानंतर डेंजर झोन मधील आमदारांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एक आमदार समाजमाध्यमातून sponsored जाहिरात प्रकाशित करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
वणी: बातमीदार