● वांजरी येथे संपन्न होतोय विवाह सोहळा
रोखठोक | MNS NEWS : “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” ही म्हण सत्यात उतरतांना दिसत आहे. मुलीचं लग्न करणं ही एक पित्याची “अग्नीपरिक्षा”च असते. त्यातच विधानसभा क्षेत्रातील अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या विवाहयोग्य मुलीच्या लग्नासाठी मनसेने “कन्यादान” योजना सुरु केली आहे. त्या महत्वाकांक्षी संकल्पनेतील पहिले लग्न 30 एप्रीलला वांजरी गावात संपन्न होत आहे. MNS’s “Kanyadan” scheme for marriage of marriageable daughter of small landholding farmers
एका भव्यदिव्य कार्यक्रमात मनसे नेता राजु उंबरकर यांनी सौ. शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. ही महत्वाकांक्षी संकल्पना सत्यात उतरत आहे. वणी विधानसभा क्षेञातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
सदोदीत आर्थिक संकटात परिसरातील बळीराजा असतो. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना पाचवीलाच पुजलेला असल्याने लेकीच्या लग्नाची चिंता असतेच हिच बाब हेरून उंबरकर यांनी कन्यादान योजना अमलात आणली आहे.
विवाह समारंभात मंडप, डेकोरेशन, जेवणासह इतर खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येणार आहे. वाजंरी येथील भास्कर नाचणकर यांची जेष्ठ कन्या रेणुका हिचा विवाह वरोरा तालुक्यातील माढेळी येथील दिलीप बावणे यांचे चिरंजीव प्रशांत सोबत वांजरी येथील वंदनीय तुकडोजी महाराज सभागृहात संपन्न होणार आहे. विवाह सोहळयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
वणी विधानसभा क्षेञात सतत, सलग कार्यरत असणारा एकमेव नेता राजु उंबरकर हेच आहेत. विविध सामाजीक, जनहितार्थ उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर आहेत. अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी उंबरकर यांनी राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना राबवून हजारो शेतकऱ्याना मोफत बी- बियाणे वाटप केले होते. त्याप्रमाणेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी कन्यादान योजना कार्यान्वित करून पित्याचे ओझे कमी केले आहे.
वणी: बातमीदार