Home Breaking News एकतर्फी विजय, कासावार यांनी गड राखला

एकतर्फी विजय, कासावार यांनी गड राखला

● शेतकरी महा विकास आघाडी पॅनेलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला.

2116

झरी जामनीत मारली बाजी

रोखठोक | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या संचालक मंडळासाठी रविवार दि. 30 एप्रीलला मतदान पार पडले. सायंकाळी मतमोजणी करण्यात आली असता महाविकास आघाडीच्या शेतकरी महा विकास आघाडी पॅनेलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. Mahavikas Aghadi shocked the MLA group and won all the seats.

झरी जामनी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या 18 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेना ( ठाकरे गटाचे) माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली. तर विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या गटाने कडवी झुंज दिली.

बाजार समितीच्‍या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही गटाने नियोजनबद्ध रणनीती आखली होती. प्रत्येक मतदारपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु महाविकास आघाडीने आमदार गटाला धक्का देत सर्व जागा निवडून आणल्या.

सहकारी संस्था गटातील विजयी उमेदवार
शेतकरी महाविकास आघाडी गटाचे राजीव कासावार, राजू उपरे, संतोष जंगीलवर, रवी ढेंगळे, निलेश बेलेकार, प्रशांत बघेले, मंगेश मोहितकर, शंकर पाचभाई, गिरीधर उईके, प्रतीक्षा पायताडे, माणिचुडा वैद्य

ग्राम पंचायत गटातील विजयी उमेदवार
दुष्यंत उपरे, रविदास झाडे, दयाकर गेडाम, सचिन यले

व्यापारी अडते व हमाल गटातील विजयी उमेदवार
गंगाधर गोरकुंटवर, अरविंद एनगंट्टीवर व राजू मंदुलवार हे विजयी झाले आहेत.
वणी : बातमीदार