Home Breaking News बालकाला जिवंत वीजतारेचा धक्का

बालकाला जिवंत वीजतारेचा धक्का

● वीज वितरणची अनोगोंदी ● गंभीर जखमी बालकांवर उपचार सुरू

2003

वीज वितरणची अनोगोंदी
गंभीर जखमी बालकांवर उपचार सुरू

रोखठोक | तालुक्यातील लाठी या गावातील काही मुले शेतात क्रिकेट खेळायला गेले होते. मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान 9 वर्षीय बालकाला खाली पडलेल्या जिवंत वीजतारेचा स्पर्श झाला. या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेस वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. The child was touched by a downed live electrical wire. Treatment of seriously injured children started

पियुष संभाशीव माहुरे (09) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह लाठी या गावात वास्तव्यास आहे. मंगळवारी तो आपल्या मित्रांसोबत गावालगतच्या सुरेश आनंदराव माहुरे यांचे शेतात क्रिकेट खेळायला गेला होता. खेळताना शेतात पडलेल्या जिवंत वीज तारेचा स्पर्श त्याच्या हाता-पायाला झाला व तो खाली कोसळला.

ही घटना बघताच बाकीचे मुलं घाबरली व धावत जाऊन शेतमालकाला घडलेला प्रकार सांगितला. नंदकिशोर माहुरे हे तडक काही ग्रामस्थांना सोबत घेऊन शेतात पोहचले व जखमी बालकाला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेत मालक नंदकिशोर माहुरे यांनी घटना घडण्याच्या एक दिवसांपूर्वी शेतातील वीज तार पडल्याची माहिती गावातील लाईनमन राजु पावडे यांना दिली होती. मात्र त्या गंभीर बाबीकडे वीज वितरण ने लक्ष दिले नाही असा आरोप करत वीज वितरण वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleअनिता वर्मा यांचे निधन
Next articleभीषण….ट्रकला दुचाकी धडकली,अपघातात दोघे ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.