Home वणी परिसर दहावीत मुलींचा डंका, “आर्या” जिल्ह्यात दुसरी

दहावीत मुलींचा डंका, “आर्या” जिल्ह्यात दुसरी

● आर्या चौधरी यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी आलेली असली तरी उप विभागातून ती अव्वल आहे. तिला 500 पैकी 491 (98.20 %) गुण मिळाले आहेत.

513

हिंदी, गणित व आय. टी. विषयात शतप्रतिशत

Educational news | CBSE परीक्षेचा ऑनलाईन (online) निकाल नुकताच जाहीर झाला. अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आर्या मनीष चौधरी हिने हिंदी, गणित व आय. टी. विषयात शतप्रतिशत गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला तर वणी उप विभागातून अव्वल स्थान पटकावले. Arya Manish Chaudhary, a student of Alfors Swarnalila International School, passed Hindi, Mathematics and I. T. Got 100% marks in the subject.

केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून बारावीत अव्वल येण्याचा मान श्रेया ओम ठाकूर (चव्हाण) हिने पटकावला आहे तर दहावीत केवळ अल्पशा गुणाने आर्या मनीष चौधरी हिचा पहिला क्रमाकं हुकला आणि ती जिल्ह्यात दुसरी आली आहे.

आर्या चौधरी यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी आलेली असली तरी उप विभागातून ती अव्वल आहे. तिला 500 पैकी 491 (98.20 %) गुण मिळाले आहेत. हिंदी, गणित व आय. टी. विषयात तिला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहेत. तर इंग्रजी विषयात 97, विज्ञान विषयात 95 तर सोशल सायन्स विषयात 99 गुण मिळाले आहे.

आर्या चौधरी ही अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती तिचे यशाचे श्रेय तिचे आई-वडील, काका व काकू, शाळेचे संचालक नरेंद्र रेड्डी, मुख्याध्यापिका डॉ. सोजन्या, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि लोया सर यांना देत आहे.
वणी: बातमीदार