Home वणी परिसर आणि…आमदारांनी वेकोली अधिकाऱ्यांना ‘फटकारले’

आणि…आमदारांनी वेकोली अधिकाऱ्यांना ‘फटकारले’

● मानव निर्मीत समस्‍येंनी ग्रामस्‍थ हैराण ● 5 जुन पर्यंतचा अल्‍टीमेटम अन्‍यथा खान बंद

979

मानव निर्मीत समस्‍येंनी ग्रामस्‍थ हैराण
5 जुन पर्यंतचा अल्‍टीमेटम अन्‍यथा खान बंद

Wcl News | वेकोली (wcl) प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिवसेदिवस चव्‍हाटयावर येतांना दिसत आहे. विविध मानव निर्मीत समस्‍येंने स्‍थानिक ग्रामस्‍थ कमालीचे संतापले आहेत. सोमवारी आयोजीत बैठकीत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार ( sanjivreddi bodkurwar ) यांनी वेकोली अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले असुन 5 जुन पर्यंतचा अल्‍टीमेटम देत समस्‍यांचे निवारण करा अन्‍यथा खान बंदचा गर्भित इशारा दिला आहे. Wcl officials are well reprimanded and given an ultimatum of June 5 to resolve the issues or the mine will be closed.

वेकोलीच्‍या मानव निर्मीत ओबी ( OB ) डंपिंग मुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी प्रचंड अडचनी निर्माण झाल्या असुन उकणी पासून वणी व घुग्घुस ला जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य रस्ता ओबी डंपिंग मुळे पावसाळ्यात बंद होण्याच्या मार्गावर आहे. मानव निर्मीत मातीचे ढिगारे आणि त्‍यापासुन वातावरणात पसरणारी धुळ यामुळे प्रदुषण कमालीचे वाढले आहे. विविध आजाराचा सामना स्‍थानिकांना करावा लागत आहे. तर वेकोलीच्या वतीने लावण्‍यात आलेल्‍या काटेरी बाभळी मुळे विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.

वेकोली निर्मीत विविध समस्‍येंबाबत उकणी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन खाडे यांनी आ. बोदकुरवार यांना निवेदन दिले होते. आमदारांनी तातडीने सोमवारी सायंकाळी वेकोली प्रशासन व महसुल प्रशासन,  बांधकाम विभाग व अन्‍य अधिकारी यांची बैठक आयोजीत केली. याप्रसंगी सरपंच खाडे यांनी समस्‍येंचा पाढाच वाचला असता आ. बोदकुरवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आयोजीत बैठकीत विजय पिदुरकर,  तहसीलदार निखिल धुळधर, वणी नार्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्रीवास्ताव, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय उप महाप्रबंधक प्रमोद कुमार, निलजई चे उपक्षेत्रीय प्रबंधक अतुल सिंह,  उकणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक राजेंद्र कुमार, सार्वजनिक बांधकाम वणी उपविभाग़ाचे उप अभियंता व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आ. बोदकुरवार यांनी स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या समस्‍या ऐकताच वेकोली अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व 5 जून पर्यंत संपूर्ण समस्या मार्गी लावण्‍याचे आदेश दिले. अन्यथा उकणी व निलजई खुल्या खदानीचे काम बंद करण्याचा गर्भित इशारा वेकोली अधिकाऱ्यांना दिला तसेच उकणी गावाच्या पुनर्वसनाची समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिलेत.

यावेळी आयोजीत बैठकीला उकणीचे सरपंच सचिन खाडे, पिंपळगावचे सरपंच दिपक मत्ते, उकणीचे उपसरपंच नरेंद्र बलकी, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिवरकर, उज्वला धांडे, कविता शेन्द्रे, आचल रोडे,  तंटा मुक्ति अध्यक्ष रामदास क्षीरसागर, पो.पाटिल नत्थू खाडे व मोठ्या संखेने गावकारी उपस्थित होते.
Rokhthok News

Previous articleDysp पुजलवार यांची मुख्यालयात बदली
Next articleस्टोव्हचा भडका, वृद्ध महिला मृत
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.