Home वणी परिसर बारावीत तालुक्यातून ‘जया’ प्रथम तर ‘युक्ता’ द्वितीय

बारावीत तालुक्यातून ‘जया’ प्रथम तर ‘युक्ता’ द्वितीय

1099
Img 20241016 Wa0023

मुलींनी मारली बाजी
 तालुक्याचा निकाल 80:87 टक्के 

Wani News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. यात वणी पब्लिक स्कूलची वाणिज्य शाखेची विध्यार्थीनी जया विजय पांडे (92.17) गुण मिळवत तालुक्यातून अव्वल आली आहे तर विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची युक्ता प्रमोद बैद (89.83) हिला मिळाला आहे. Wani Public School has maintained its tradition of success with Pooja Pandey securing 92.17 percent marks to come first from the taluka.

फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे वणी तालुक्यातून 1888 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 1527 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर तालुक्याचा निकाल (80.87) टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी वणी पब्लिक स्कूल ने आपली यशाची परंपरा कायम राखली असून जया विजय पांडे 92.17 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातुन प्रथम आली आहे. तर लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल ची युक्ता प्रमोद बैद हीने विज्ञान शाखेतून 89.83 टक्के गुण मिळवत प्रथम येत तालुक्यातुन दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

शाळानिहाय निकाल पुढील प्रमाणे 

लोकमान्य टिळक महाविद्यालयात 77.57, शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महा 83.90, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय घोन्सा 70.90, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा 69.81, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर 93.65, जी प शासकीय महाविद्यालयात वणी 62.50, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय वणी 61.11, राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय राजूर 59.57, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय शिंदोला 88.23, जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय वांजरी 52.00, वणी पब्लिक ज्युनियर कॉलेज 97.61, जगन्नाथ बाबा कनिष्ठ महाविद्यालय वणी 27.77, बालाजी कनिष्ठ महाविद्यालय सावरला 92.00, लायन्स इंग्लिश मिडीयम ज्युनियर कॉलेज वणी 97.29, राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय कायर 90.00 महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय कायर 88.88, भास्कर ताजने कनिष्ठ महाविद्यालय वेळाबाई 72.22, भास्कर ताजने कनिष्ठ महाविद्यालय कळमना 89.28,लोकमान्य टिळक महाविद्यालयात एमसिव्हीसी 88.23 टक्के निहाय निकाल लागला आहे.

Rokhthok News