Home वणी परिसर त्या… लिपीकला कारणे दाखवा नोटीस

त्या… लिपीकला कारणे दाखवा नोटीस

● अनावधानाने झाली होती चूक ● संपूर्ण वॉर्डातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

1193
Img 20241016 Wa0023

अनावधानाने झाली होती चूक
 गावातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

Wani News |: राजूर (कॉलरी) येथील ग्राम पंचायतच्या मासिकसभे करिता सर्व सदस्यांना नियमित नोटीस देवून आमंत्रित करण्यात येते. प्रभाग निहाय विकास कामावर चर्चा केली जाते. परंतु लिपिकाच्या अनावधानाने किंबहुना नजरचुकीने मासिक सभेची नोटीस देताना त्या सदस्यांचे नाव चुकले. याप्रकरणी त्या लिपीकला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी स्पष्ट केले आहे. The clerk inadvertently missed the name of the members while giving the monthly meeting notice.

राजूर (कॉलरी) येथील ग्राम पंचायत सदस्या बबीता सिंह यांनी अधिकाराचे हनन झाल्याचा ठपका ठेवत BDO यांना निवेदन दिले. हा त्यांचा अधिकार आहे मात्र मासिक सभेची कोणतीही नोटिस जाणीवपूर्वक देण्यात आली नाही असे सरपंच पेरकावार यांनी स्पष्ट केले आहे.

मागील बावीस महिन्याच्या कालखंडात सरपंच म्हणून कार्य करतांना पक्षपाती धोरण कधीच अवलंबले नाही. प्रभाग 1 ते 6 मधील विकासात्मक कामे मार्गी लावताना सर्वच सदस्यांना विश्वासात घेण्यात आले. अनेक मासिक सभेत काही सदस्य अनुपस्थित राहतात. त्यांनी आपल्या प्रभागातील समस्या, विकासात्मक कामे मार्गी लागावी करिता मासिक सभेत चर्चा विनिमय करणे अभिप्रेत आहे असे सरपंच विद्या पेरकावार यांनी सांगितले.

मासिक सभेची नोटीस बजावताना लिपिकाच्या नजरचुकीने सदस्या बबिता सिंह यांच्या ऐवजी माजी सदस्या बिना सिंह असे लिहण्यात आले आणि ती नोटीस मासिक सभेच्या चार दिवसापूर्वी त्यांचे घरी पाठविण्यात आल्याचे पेरकावार यांनी सांगितले. सदस्यांचे नाव का व कसे चुकले याबाबत संबंधितांना जाब विचारण्यात आला आहे असे सरपंचांनी स्पष्ट केले आहे.
Rokhthok News