Home क्राईम पोलीस उप निरीक्षकांची कार दगडाने फोडली

पोलीस उप निरीक्षकांची कार दगडाने फोडली

● टवाळखोर कारट्यांचा धुमाकूळ ● एकाच रात्री घडल्या तीन ते चार घटना

2403
Img 20241016 Wa0023

टवाळखोर कारट्यांचा धुमाकूळ
एकाच रात्री घडल्या तीन ते चार घटना

crime news wani | वणी शहरात घरा समोरील उभ्या असलेल्या आलिशान कारला टवाळखोरांनी लक्ष केले आहे. शहरातील जिजाऊ नगर परिसरात वास्तव्यास असलेले पोलीस उप निरीक्षक अरुण नाकतोडे यांच्या आलिशान कार वर मोठा दगड टाकण्यात आला तर पायाने दरवाजावर प्रहार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. A large stone was thrown on the luxury car of Police Sub-Inspector Arun Naktode.

शहरात टवाळखोर कारट्यांचा धुमाकूळ चांगलाच वाढला आहे. रात्री बेरात्री त्यांची होणारी भटकंती, नशेचा अमल आणि घडणारे कृत्य निश्चितच भविष्यातील मोठया गुन्हेगारीकडे वाटचाल करणारे आहे. शहरात आलिशान वाहनांना क्षती पोहचविण्याचा चाललेला उपद्व्याप थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री जिजाऊ नगर परिसरातील PSI अरुण नाकतोडे यांच्या नव्या करकरीत वाहनावर दगड घातला तर त्याच मार्गावरील अन्य वाहने सुद्धा लक्ष केले. चिखलगाव परिसरातील एका इमारती समोर ठेवण्यात आलेली कार दगडाने फोडण्यात आली. असे प्रकार शहरात बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चर्च जवळ सुद्धा कार वर दगड टाकण्यात आला होता. तर माजी नगरसेवकांचे वाहन ज्वलनशील द्रव टाकून जाळण्याची घटना घडली होती.
Rokhthok News

 

Previous articleत्या… लिपीकला कारणे दाखवा नोटीस
Next articleSDPO गणेश किंद्रे यांनी स्वीकारला पदभार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.