Home Breaking News विषारी द्रव प्राशन केले, उपचारादरम्यान मृत्यू

विषारी द्रव प्राशन केले, उपचारादरम्यान मृत्यू

● चिखलगाव येथील घटना

1131

● चिखलगाव येथील घटना

Poison case News Wani : तालुक्यातील चिखलगाव येथे 48 वर्षीय व्यक्तीने बुधवार दि. 31 मे ला पहाटे विषारी द्रव प्राशन केले. पारिवारिक मंडळींनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. His family immediately shifted him to the hospital where he died during treatment on Thursday.

पांडुरंग रामचंद्र सातपुते (48) असे मृतकाचे नाव आहे ते आपल्या परिवारासह चिखलगाव येथे वास्तव्यास होता. नैराश्यातून त्यांनी गुरुवारी पहाटे विषारी द्रव प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यास सांगितले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा आप्तस्वकीय परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News