Home Breaking News दहावीत मुलींचाच बोलबाला, ‘जान्हवी’ अव्वल तर ‘हिमानी’ द्वितीय

दहावीत मुलींचाच बोलबाला, ‘जान्हवी’ अव्वल तर ‘हिमानी’ द्वितीय

● तालुक्याचा निकाल 89.97 टक्के

2466

तालुक्याचा निकाल 89.97 टक्के

SSC Exam Result : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावेळी  परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल ची जान्हवी संजय पांडे (95:60) टक्के गुण प्राप्त करत तालुक्यातून अव्वल ठरली तर वणी पब्लिक स्कूल ची हिमानी निलेश चचडा (95:40) दुसरी व जनता विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षा विनोद ठमके (95:20) गुण मिळवत तिसरी आली आहे. तालुक्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचाच बोलबाला राहिला आहे. Girls have won in class 10th examination. “Rutuja” of Lions English Medium School emerged as the topper from the taluka

वणी विभागातून 2425 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 2182 विद्यार्थी म्हणजे 89.97 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. वणी विभागातून चार शाळांचा निकाल 100 टक्के लागला यात वणी पब्लिक स्कूल, संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल, भास्कर ताजने विद्यालय, कळमना व राजश्री शाहू महाराज विद्यालय असे आहेत. तर सर्वात कमी निकाल म्हणजे 20 टक्के हा जगन्नाथ महाराज विद्यालय वणीचा आहे.

वणी तालुक्यातून एक ते पाच स्थानापर्यंत मुलांना पोहचू दिले नाही. शाळा निहाय प्रथम येण्याचा मान बहुतांश शाळेत मुलींनीच पटकावला आहे. या वर्षी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी ‘जान्हवी’ तालुक्यातून पहिली आली तर वणी पब्लिक स्कूल ची ‘हिमानी’ हिने द्वितीय स्थान पटकावले, तिसरी जनता विद्यालयाची विद्यार्थिनी ‘हर्षा’ तर चौथी शिक्षण प्रसारक मंडळ शाळेची विद्यार्थिनी प्राची विवेक देठे हिला 94:80 टक्के गुण मिळाले आहे.
Rokhthok News