Home वणी परिसर विठ्ठलवाडीतील रस्‍त्‍याची लागली पुरती ‘वाट’

विठ्ठलवाडीतील रस्‍त्‍याची लागली पुरती ‘वाट’

● शहरातील अनेक अंतर्गत रस्‍ते अखेरची घटका मोजत आहे अनेक वार्डात रस्‍त्‍याची अवस्‍था....

749

आमदार निधीतुन पुर्तता करण्‍याची मागणी

Development works news : वणी शहरातील अनेक अंतर्गत रस्‍ते अखेरची घटका मोजत आहे. अनेक वार्डात रस्‍त्‍याची अवस्‍था दयनिय झाली आहे. विठ्ठलवाडी परिसरातील महिलांनी आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांची भेट घेवून रस्‍त्‍याचे कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्‍लॉक बसविण्‍याची मागणी केली आहे. MLA Sanjeevreddy Bodkurwar has been met and demanded for concretization of the road and installation of favorblocks.

आमदार बोदकुरवार यांनी विकासकामांचा धडाका लावलेला आहे. प्राप्‍त निधीतुन मोठया प्रमाणात कामे होत असतांना काही प्रभागात विकास कामांना चालना मिळत नसल्‍याचे दिसत आहे. शहरातील विठ्ठलवाडी परिसरात नगर पालीकेच्‍या पाणी पुरवठा पाईपलाईन व वैयक्‍तीक नळ जोडणी करीता होणाऱ्या खोदकामांमुळे रस्‍त्‍याची पुरती वाट लागली आहे.

विठ्ठलवाडी सह विविध प्रभागातील मुलभुत सोयी सुविधांकरीता निधीची पुर्तता करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले आहे. माञ अदयाप विकास कामांना सुरुवात करण्‍यात आली नाही. विठ्ठलवाडीतील वामनराव डाखरे यांचे घरांपासुन रघुनाथ मोहिते यांचे घरा पर्यंतच्‍या रस्‍त्‍याच्‍या कॉक्रिटीकरण व पेव्हर ब्‍लॉक चे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.

विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांच्‍या भावनांचा विचार करुन आमदार बोदकुरवार यांनी विनाबिलंब मागणीची पुर्तता करावी असे निवेदनातुन नमुद करण्‍यात आले आहे. याप्रसंगी प्रतिभा निलेश म्‍हसे, रिता संजय खाडे, सुनिता भास्‍कर खंडाळकर,  योगीता राजु दुदुलकर, अस्मिता बाळु देवतळे यांचेसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Rokhthok News