● शिरपुर पोलीसांची समयसुचकता
Wani News : शिरपुर पोलीस स्टेशन हददीत येत असलेल्या कैलास नगर येथे दि. 17 जुन रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतावस्थेत आढळलेली व्यक्ती कोण असा प्रश्न उपस्थीत होत असतांना शिरपुर पोलीसांच्या समयसुचकतेने त्या मृतदेहाची ओळख पटली. तर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. At Kailas Nagar which is coming under Shirpur Police Station limits. On June 17, the body of an unknown person was found.
घटनेच्या दिवशी कैलास नगर येथील शिव मंदीर जवळ अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत पडुन असल्याची माहीती शिरपुर पोलीसांना मिळाली. ठोणदार गजानन करेवाड यांच्या मार्गदशात पोलीसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी मृतदेहाजवळ कुठलाही पुरावा सापडला नसल्याने ओळख पटत नव्हती. परंतु परीसरात चौकशी केल्यांनतर मात्र मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली.
जुगेस बजनाश लाल (40) रा. उदयपुर,जि. रोहताक राज्य बिहार असे मृतकाचे नाव आहे. मृतक जुगेस हा कोलगाव साखरा येथे वास्तव्यास होता. ओळख पटल्यानंतर पोलीसांनी त्याच्या नातेवाईकांना तातडीने घटनास्थळी बोलावले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. त्यावेळी लिव्हर खराब झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कीद्रे यांचे सूचना व मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, psi रामेश्वर कांडुरे, npc गजानन सावसाकडे यांनी केली आहे.
Rokhthok News