Home Breaking News रखरखत्या उन्हात ‘तो’ चक्क… रस्त्यासाठी रस्त्यावर झोपला

रखरखत्या उन्हात ‘तो’ चक्क… रस्त्यासाठी रस्त्यावर झोपला

● अनोखे व स्वतःला 'ताप' देत केलेल्या आंदोलनाने निगरगट्ट प्रशासनाचे लक्ष वेधेल का ?

910

आरटीआय कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

movement news wani | कोण..कधी..कशा स्वरूपाचे आंदोलन करेल हे सांगता येत नाही. अनोखे व स्वतःला ‘ताप’ देत केलेल्या आंदोलनाने निगरगट्ट प्रशासनाचे लक्ष वेधेल का हा संशोधनाचा विषय आहे. बुधवारी दुपारी रखरखत्या उन्हात रस्त्यासाठी रस्त्यावर झोपून आरटीआय कार्यकर्त्यांने अनोखे आंदोलन केले. RTI activists staged a unique protest by sleeping on the road in the scorching sun.

दादाजी पोटे असे आंदोलनकर्त्याचे नाव आहे, ते रंगनाथ नगर येथे वास्तव्यास असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य नागरिकाची वर्दळ असलेल्या तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, न्यायालय परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली.

अगदी महत्वाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या डागडुजी साठी त्यांनी निवेदनातून आर्जव केले. मात्र प्रशासनाने त्यांच्या निवेदनाला सातत्याने कचऱ्याची टोपली दाखवली. खेड्यापाड्यातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या दयनीय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.

शहरातील मुख्य रस्त्यापासून केवळ 500 मीटर असलेला रस्ता प्रशासन दुरुस्त करत नसल्याने पोटे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. सकाळी 11 वाजतापासून भर उन्हात ते तहसील समोर रस्त्यावर झोपून आंदोलन करताहेत. कुंभाकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला मात्र जाग आलेली नाही तर संपूर्ण दिवसभर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने सर्व सामान्यांच्या मनात चीड निर्माण होत आहे.
Rokhthok News