● अल्पावधीत मिळवली होती लोकप्रियता
Transfers of Police Inspector : परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने जिल्हयातील विहीत कालावधी पूर्ण झालेल्या निःशस्त्र पोलीस निरिक्षकांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहे. जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांची बदली अकोला येथे झाली असून तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेशीत करण्यात आले आहे. Police Inspector Pradeep Shiraskar of Wani Police Station has been transferred to Akola
यवतमाळ जिल्ह्यातुन कालावधी पूर्ण झालेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या परिक्षेत्रात करण्यात आल्या आहेत. यात वणीचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना अकोला तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांची वाशीम येथे बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ येथील पोलीस निरीक्षक धर्मा सोनोने, दिनेशचंद्र शुक्ला, पितांबर जाधव, मनोज केदारे व संजय चौबे यांचा जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर अन्य जिल्ह्यातील भूषण गावंडे, गिरीश ताथोड, अनिल पाटील, सोमनाथ जाधव, आधारसिंग सोनोने, हरीश गवळी, सुनील हूड आणि संजय सोळंके हे पोलीस निरीक्षक जिल्ह्यात आले आहेत.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण पोलीस ठाणे म्हणून संपूर्ण राज्यात वणीची ओळख अधोरेखित झाली आहे. वणीचा कार्यभार मिळावा म्हणून अनेक अधिकारी ‘देव’ पाण्यात ठेवून असतात. वणी पोलीस ठाणे सांभाळण्यासाठी खमक्या पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे. ‘रोखठोक’ वर्तन आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याला येथील नागरिक डोक्यावर घेतात हे वास्तव नाकारता येत नाही.
Rokhthok News