● मृतदेह MSEB कार्यालयात ठेवला
Wani News | MSEB चा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवेगाव शिवारात शेतात लोम्बकळत असलेल्या वीज वितरणाच्या जिवंत वीज तारेला अनपेक्षित स्पर्श झाल्याने 36 वर्षीय मजूर ठार झाल्याची घटना बुधवार दि. 28 जूनला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. A 36-year-old laborer was killed due to accidental contact with a live electric wire on Wednesday. It happened on June 28 between 5 pm.
शंकर केशव दुरुतकर (36) राहणार शिरपूर असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी तो नवेगाव शिवारातील ठमके यांच्या शेतात गेला होता. त्या शेतात वीज वितरणचे खांबावरुन जात असलेली जिवंत वीज तार खाली लोम्बकळत होती.
शेतात खाली पडलेली विजेची तार शंकर ला दिसली नाही आणि विजेचा जबर धक्का बसला. ही बाब शेतातील अन्य नागरिकांना कळताच पोलीस व वितरण विभागाला सूचित करण्यात आले. वीज वितरणाच्या हलगर्जीपणा मुळे नाहक बळी गेल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला. नागरिक व त्याच्या नातेवाईकांनी थेट मृतदेह वीज वितरण कार्यालयात नेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन करेवाड आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले असून वृत्त लिहे पर्यंत वीज वितरण कार्यालयातून मृतदेह हलविण्यात आला नव्हता. यावर काय तोडगा निघणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News