Home वणी परिसर On the duty…वाहतुक निरिक्षक वणीच्‍या रस्‍त्‍यावर…!

On the duty…वाहतुक निरिक्षक वणीच्‍या रस्‍त्‍यावर…!

● अस्‍ताव्‍यस्‍त वाहतुक आणि आव्हान

1863

अस्‍ताव्‍यस्‍त वाहतुक आणि आव्हान

Wani News | वाहतुक नियंञण उप शाखेत नव्‍यानेच API सिता वाघमारे रुजु झाल्‍यात. शहरातील वाहतुक व्‍यवस्‍थेचा जायजा घेण्‍यासाठी वणीच्‍या रस्‍त्‍यावर त्‍या On the duty निघाल्‍यात. वाहतुक व्‍यवस्‍थेला शिस्‍त लावण्‍यासाठी कठोर निर्णय घ्‍यावे लागणार आहेत. त्‍यांना आजमितीस अस्‍ताव्‍यस्‍त वाहतुकीचा नजारा दिसेल आणि आव्‍हानाचे निवारण करण्‍यासाठी रणनिती आखावी लागणार आहे. They have to take tough decisions to discipline the transport system.

वणी शहरातील अंतर्गत रस्‍ते अरुंद आहेत, त्‍यातच गजबजलेली बाजारपेठ. लघु व्यावसायिकांनी पदपथावर केलेले अतिक्रमण यामुळे सातत्‍याने उडत असलेला वाहतुकीचा बोजवारा हे वाहतुक कर्मचाऱ्यासाठी डोकेदुखी ठरणारा आहे. शहरातील वाहतुक व्‍यवस्‍था निट आणि शिस्‍तीत व्‍हावी याकरीता एकमार्गी वाहतुक प्रशासनाच्‍या महत्प्रयासाने सुरु केली होती. ती प्रशासनाच्‍याच हलगर्जीपणामुळे बंद करण्‍यात आली आहे.

शहरात अवजड वाहनांना मनाई करण्‍यात आली आहे. याकरीता विहीत कालावधी ठरविण्‍यात आला आहे. परंतु येथील बाजारपेठेत व्‍यापारी रस्‍त्‍यावर अवजड वाहने लावून माल चढवत -उतरवत असल्‍याने अनेकदा रहदारीचा बट्याबोळ होत असल्‍यामुळे वाहतुक शाखेने व्यावसायिकांच्या दबावाला बळी न पडता नियमांची कठोर अमलबजावणी करणे गरजेचे आहे.

शहरात प्रवासी वाहनांची मुजोरी सर्वश्रृत आहे, त्‍यांनी ठिक ठिकाणी गाव निहाय थांबे निर्माण केले आहे. रस्‍त्‍यावरील ऑटो पॉईंट, पदपथावरील फेरीवाले आणि रस्‍त्‍यावर पार्क करण्‍यात येत असलेली वाहने खऱ्या अर्थाने लहानसहान अपघाताला कारणीभूत ठरणारी आहे. वाहतुक शाखेने यावर नियंञण ठेवल्‍यास काही प्रमाणात शिस्‍त लागण्‍यास मदत होणार आहे.

लालपुलीया परिसरात थाटण्‍यात आलेल्‍या कोलडेपो मध्‍ये कोळशाची साठवणुक व देशभरात वितरण केल्‍या जाते. याकरीता मोठया प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल या परिसरात असते. भरधाव धावणारी वाहने, रस्‍त्‍यावर उभी करण्‍यात येणारी अवजड वाहने अपघातासाठी निमीत्‍तमाञ ठरत असल्‍याचे वणीकर नागरी‍कांनी अनुभवले आहे.

लालपुलीया परिसरात नाहक अनेक निष्‍पाप जीव अपघातात गेले आहेत. या ठिकाणी वाहतूक शाखेने विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच लालपुलीया परिसर, टोल नाक्‍या जवळ महामार्गावर बेदरकारपणे उभी ठेवण्‍यात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची श्रृखंला अपेक्षीत आहे.
Rokhthok News