● आयोजित रॅलीने शहर दणाणले
“गुरुब्र्रम्हां गुरुर्विष्णू,गुरु देवो महेश्वरः”
“गुरु साक्षात परब्रह्म,तस्मै श्री गुरवे नमः”
Wani News : वणी शहरात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वणीकर नागरिक मोठया उत्साहात मिरवणुकीत सहभागी होतात. फटाक्यांची आतिषबाजी, डीजेचा कडकडाट आणि भव्यदिव्य मिरवणूक खरे आकर्षण असते. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक शहर दणाणून सोडते..
Guru Poornima has a different and very special significance. Guru Poornima is celebrated every year on Ashad Poornima.
गुरुपौर्णिमाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. आज 3 जुलै ला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. व्यास ऋषींचे स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
येथील साई मंदिरातून मिरवणुकीची सुरवात होते. शहरातील सर्वपक्षीय नेते, पुढारी, मान्यवर नागरिक आणि तरुण- तरुणी, महिला मोठया भावभक्तीने मिरवणुकीत सहभागी होतात. संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करण्यात येते. सर्वधर्मीय नागरिक ठिकठिकाणी अन्नछत्र उभारून भक्तांची काळजी घेतात
या दिवशी आपल्या गुरुंचा आदर आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यात येते. धर्मग्रंशातही गुरुचे स्थान हे भगवंतांच्या बरोबरीचे असल्याचे म्हटले जाते. शहरात अतिशय धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्यात येतो.
शहरातील हा भक्तिमय उत्सव शांततेत पूर्णत्वास पडावा याकरिता SDPO गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव, वाहतूक शाखेच्या API सीता वाघमारे यांनी विशेषत्वाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Rokhthok News