Home Breaking News रानडुक्कराचा जबर हल्ला, वृद्ध ठार

रानडुक्कराचा जबर हल्ला, वृद्ध ठार

● जंगलात बकऱ्या चराईसाठी घेउन गेले होते बाजुच्‍या झुडपातुन त्‍यांच्‍यावर.....

1059
Img 20241016 Wa0023

कायर शिवारातील घटना

wild boar attack | तालुक्‍यातील कायर शिवारातील जंगलात बकऱ्या चारत असलेल्‍या (65) वर्षीय वृद्धावर अचानक रानडुक्कराने हल्‍ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. ही घटना मंगळवार दि. 4 जुलैला दुपारी 2 वाजताच्‍या सुमारास घडल्‍याने शेतकरी व मजुर वर्गात खळबळ माजली आहे. The old man was suddenly attacked by a wild boar. He was seriously injured and died on the spot.

नामदेव सोयाम (65) असे मृतकाचे नाव आहे. ते कायर (पिंपरी) येथील निवासी असुन मोलमजुरी तसेच गावातील शेतकऱ्यांच्या बकऱ्या चराईचे काम करतात. नेहमीप्रमाणे ते कायर लगत असलेल्‍या जंगलात बकऱ्या चराईसाठी घेउन गेले होते. बाजुच्‍या झुडपातुन त्‍यांच्‍यावर रानडुक्कराने जबर हल्‍ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले होते.

तालुक्‍यातील जंगल सदृष्‍य भागात असलेल्‍या शेतशिवारात वन्‍य प्रांण्‍याचा मुक्‍त संचार कमालीचा वाढला आहे. शेतीपिकांची नासाडी तसेच वन्‍य प्रांण्‍याकडुन होणारे हल्‍ले नित्‍याचेच झाले आहे. आज घडलेल्‍या घटनेने कायर शिवारातील शेतकरी व शेतमजूर चांगलेच धास्‍तावले आहे.

काही शेतकऱ्यांना घटनेची माहीती मिळताच त्‍यांनी मुकूटबन पोलीस स्‍टेशन व वनविभागाला सुचना दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. मृतक नामदेव याचे पश्चात पत्‍नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा आप्‍त परीवार आहे. याप्रकरणी वनविभागाने मृतकाच्‍या परीवाराला आर्थीक मदत करावी अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.
Rokhthok News