● नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन
Social News | वणी येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा माजी नगरसेवक संबा वाघमारे यांना प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेड च्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून भव्य सोहळ्याचे आयोजन 9 जुलैला करण्यात आले आहे. Samba Waghmare will be given the prestigious Samaj Ratna Award.
संबा वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, जनहितार्थ कार्यात अग्रेसर आहे. चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. ते विविध उपक्रम सातत्याने राबवत असतात. वणी येथे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संत रविदास महाराज यांचे मंदिर बांधलेले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेण्यात आली आहे.
वणी, मारेगाव, झरी तालुक्यात कोरोना काळात संबा वाकुजी वाघमारे यांनी चर्मकार समाजातील गरीब कुटुंबांना 6.50 लाख रुपयांचे अन्न धान्य वाटप केले, जिवती, गडचांदूर, भद्रावती, पांढरकवडा, माळवटा जिल्हा परभणी येथील संत रविदास मंदिर बांधकामास भरीव मदत केली, समाजातील 50 बांधवांना EPF योजनेचा लाभ देऊन मदत केली, गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजातील जेष्ठ बांधवाचा सत्कार, अडीअडचणी मध्ये असलेल्या समाज बांधवांना मदत करणे,वणी येथे श्री.संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र बांधलेले आहे.
9 जुलै ला नांदेड येथील देवकृपा हॉल येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ च्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडणार आहे. याप्रसंगी माजी खासदार सुभाष वानखडे, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या प्रमुख उपस्थितीत संबा वाघमारे यांचा ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.
Rokhthok News