● महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपक्रम
MNS NEWS WANI | राज्यात प्रचंड चीड आणणाऱ्या घडामोडी राजकिय वर्तुळात घडत आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. मनातील ‘खदखद’ दूर सारण्यासाठी “एक सही संतापाची” हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केला आहे. रविवारी येथील टिळक चौकात मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. Citizens have expressed their feelings by signing the placard erected by MNS at Tilak Chowk here on Sunday.
महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या राजकीय फेरबदला बाबत सामान्य नागरिकांमध्ये अतिशय तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ह्या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करण्याकरिता एक सही संतापाची हा उपक्रम मनसे चे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सदर उपक्रमाची सुरुवात स्वाक्षरी करून केली त्यानंतर सामान्य नागरिकांकडून सदर स्वाक्षरीय मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी चौकात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी फलकावर स्वाक्षरी करून मनसेच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.
राज्यात विविध समस्या उभ्या ठाकल्या असून नगरिक त्रस्त आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यात राजकारण्यांना फारसे स्वारस्य नसल्याने त्यांच्या संतापात भर पडत आहे. याला वाचा फोडण्यासाठी मनसेकडून राबविण्यात आलेल्या ‘एक सही संतापाची’ मोहीमेत सकाळपासून शेकडो नागरिकांनी मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर सही करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्यात आली आहे.
Rokhthok News