Home Breaking News बालिकेला फूस लावून पळवले, आरोपी तरुण गजाआड

बालिकेला फूस लावून पळवले, आरोपी तरुण गजाआड

● चंद्रपूर जिल्ह्यातून करण्यात आली अटक

1681

चंद्रपूर जिल्ह्यातून करण्यात आली अटक

Crime News | अल्पवयीन बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेले. घरच्या मंडळींनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी तरुणासह बालिकेला चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथून ताब्यात घेतले. A minor girl was caught in a love net and kidnapped.

गुलाम रजब अली (22) असे मजनू तरुणाचे नाव आहे तो वणी तालुक्यातील निवासी आहे. त्याने 15 वर्षीय बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. ती पीडिता आजी-आजोबा सोबत राहत होती. सोमवार दि. 10 जुलै ला पहाटे ती घरात आढळून आली नाही.

बालिकेची शोधाशोध करण्यात आली, नातेवाईकांकडे विचारणा करण्यात आली मात्र तिचा थांगपत्ता लागत नव्हता. नातीला कुणीतरी तरी फूस लावून पळवून नेल्याचा आजीला संशय आला. त्यांनी थेट वणी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपासाची गती वाढवली असता, आरोपी तरुणाने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तर गावातीलच आरोपीही नदारद असल्याने त्यानेच पीडितेला पळवल्याचे निष्पन्न झाले. पीडिता ही दुर्गापूर येथील आरोपी तरुणाच्या एका नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाली.

ठाणेदार अजित जाधव यांनी पोलिसांचे पथक दुर्गापूर ला रवाना केले. तिथे बालिका व आरोपी दोघेही आढळून आले त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आरोपी तरुणावर भादंविच्या कलम 366 (अ) 376 (2) (N) यासह बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) च्या कलम 4,6 व 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rokhthok News