Home राजकीय अन्यायग्रस्त शेतकरी संतप्त, बुधवारी रास्तारोको

अन्यायग्रस्त शेतकरी संतप्त, बुधवारी रास्तारोको

● शेतकरी संघटना आक्रमक ● वाढीव मोबदला न मिळाल्‍याने संताप

482

शेतकरी संघटना आक्रमक
वाढीव मोबदला न मिळाल्‍याने संताप

Wani news | तालुक्‍यातील कळमना (बु) येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वणी ते देवाडा (जि. चंद्रपुर) या राज्‍य मार्गासाठी अधिग्रहीत करण्‍यात आल्‍या. मात्र प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा वाढीव मोबदला देण्यात आला नाही. यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी संतप्‍त झाले असुन शेतकरी संघटनेच्‍या माध्‍यमातुन बुधवार दि. 19 जुलैला न्‍याय मिळेपर्यंत रास्‍तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. No increment was given. This angered the farmers who suffered injustice

वणी ते देवाडा या राज्‍यमार्गासाठी कळमना येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने अधिग्रहीत केल्‍या. वाढीव मोबदला मिळावा म्‍हणुन बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला आर्जव केले. त्‍यासाठी न्‍यायालयिन आदेश सुध्दा झाला आहे. मात्र राज्‍य शासनाकडुन अन्‍यायग्रस्‍त शेतकऱ्यांना नियमानुसार देय असणारा वाढिव मोबदला प्राप्‍त झाला नाही.

वाढिव मोबदला मिळावा या मागाणीसाठी अन्‍यायग्रस्‍त शेतकरी यांच्‍यासह शेतकारी संघटनेचे तालुका प्रमुख दशरथ बोबडे पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. बुधवारी सकाळी 11 वाजता अन्‍यायग्रस्‍त शेतकऱ्यांच्या शेतातुन गेलेल्‍या मार्गावर ठिय्या मांडुन रस्‍ता रोको आंदोलन करण्‍याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी कोणतीही अप्रिय व अनैतिक घटना घडल्‍यास संबधित विभाग जबाबदार राहील असे निवेदनातुन स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.
ROKHTHOK NEWS