Home Breaking News अभियंत्‍याची खरडपट्टी, ऑडिओ क्लिप व्‍हायरल

अभियंत्‍याची खरडपट्टी, ऑडिओ क्लिप व्‍हायरल

● नियमांना तिलांजली देत, झालेले बांधकामच निकृष्‍ट व दर्जाहिन असल्‍याचा आरोप शिवसेना (उबाठा) माजी उप जिल्‍हा प्रमुख दिपक कोकास यांनी केला आहे.

2022

नियमाचा भंग, दुर्घटना घडण्‍याची शक्‍यता

PWD ROAD NEWS | वणी शहरात टिळक चौक ते बायपास पर्यंत सिमेंट कॉक्रटच्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम अर्धवट स्‍वरुपात करण्‍यात आले आहे. दिड महिन्‍यांपासुन बांधकामच ठप्‍प झाल्‍याने वणीकर नागरीकांना प्रशासनाच्‍या दडपशाहीचा फटका सहन करावा लागत आहे. Since the construction has been stopped for one and a half months, the wanikar citizens are suffering.

नियमांना तिलांजली देत, झालेले बांधकामच निकृष्‍ट व दर्जाहिन असल्‍याचा आरोप शिवसेना (उबाठा)  माजी उपजिल्‍हा प्रमुख दिपक कोकास यांनी केला आहे. याप्रकरणी विस्तृत विचारणा करत अभियंत्‍याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप व्‍हायरल झाल्‍याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

चिखलगांव रेल्‍वे गेट ते बायपास पर्यंत हरित लवादाने दिलेल्‍या आदेशान्‍वये रस्‍त्‍याचे बांधकाम काही वर्षापुर्वी करण्‍यात आले होते. त्‍यांच मार्गावर कॉक्रीटीकरण व्‍हावे अशी मागणी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केंद्रिय मंञी नितीन गडकरी यांना केली होती. यामुळेच निधी उपलब्‍ध करण्‍यात आला.

टिळक चौक ते बाजार समिती पर्यंत एका बाजुने सिमेंट कॉक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम सुरु करण्‍यात आले होते. अंदाजे 500 मिटर पर्यंतचा एका बाजुचा रस्‍ता निर्माण करण्‍यात आला. परंतु तो रस्‍ता नियमबाहय पघ्‍दतीने बांधण्‍यात आल्‍याचा आरोप कोकास यांनी केला आहे. या कामांवर देखरेख करणाऱ्या अभियंत्‍याला भ्रमनध्‍वनी वरुन विचारणा केली असता पेवर मशिनचा ‘इशू’ असल्‍याने रस्त्‍याचे बांधकाम बंद पडल्‍याचे ऑडिओ क्लिप मधुन स्‍पष्‍ट झाले आहे.

टिळक चौक ते बाजार समिती या मार्गावर शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग असल्‍याने विद्यार्थ्यांचे अवागमन मोठया प्रमाणात आहे. रस्‍ता बांधकाम बंद पडल्‍याने अपघाताची शक्‍यता बळावली आहे. त्‍याप्रमाणेच दोन्‍ही बाजुने उंच नाल्‍या बांधण्‍यात आल्‍याने स्‍थानिक नागरीकांना स्‍वतः च्‍या घरी जातांनाच यातना सहन कराव्‍या लागत असल्‍याने संताप व्‍यक्‍त होत आहे.

प्रशासनाने रस्‍ता बांधकाम करतांना स्‍थानिक नागरीकांना कोणताही ञास होवू नये याची खबरदारी घेणे गरजेचे होते. अनेकांच्‍या घरातुन पाण्‍याचा निचरा होत नाही तर अर्धवट केलेल्‍या रस्‍ता बांधकामामुळे विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोकास यांनी संताप व्‍यक्‍त करत वणीकरांच्‍या भावना अभियंत्‍याला सांगीतल्‍या तर नियमबाहय बांधण्‍यात आलेल्‍या रस्‍त्‍याबाबत केंदिय मंञी नितीन गडकरीं यांचे कडे तक्रार करणार असल्‍याचे सांगीतले.
ROKHTHOK NEWS