Home क्राईम LCB ची कारवाई, प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

LCB ची कारवाई, प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

● मालवाहू वाहनांची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला यावेळी.....

1086

दोघांवर गुन्हा दाखल, एक ताब्यात

Wani News | स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आदर्श शाळेजवळ सापळा रचला. मालवाहू वाहनांची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. यावेळी वाहन चालकासह 4 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई बुधवार दि. 19 जुलै ला रात्री करण्यात आली. 4 lakh 12 thousand 700 worth of goods were seized along with the driver of the vehicle.

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाला प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्री आदर्श शाळेजवळ सापळा रचण्यात आला. महिंद्रा कंपनीची मालवाहू गाडी क्रमांक MH -29- BE- 4755 मधे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा असल्याच्या माहितीवरून वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.

मालवाहू वाहनात पांढऱ्या रंगाचे पोत्यात खाकी रंगाचे पुठ्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मजा सुगंधीत तंबाखु 200 ग्राम क्षमतेचे 120 नग डबे किंमत 1,12,200/- रुपये असा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आढळून आला. यावेळी वाहन चालक शंकर बाबाराव खोडे, (54) रा. कात्री, ता. कळंब, जि. यवतमाळ यास ताब्यात घेऊन विचारणा करण्यात आली.

वाहन चालक शंकर याने सदर प्रतिबंधित सुगंधीत तंबाखुचा माल यवतमाळ येथील शैलेश गाडेकर याचे मालकीचा असल्याचे सांगितले व तो माळ वणीत विक्री करीता आणल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, LCB प्रमुख PI आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात घनशाम दंदे. (अन्न सुरक्षा अधिकारी) तसेच API अमोल मुडे, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, चालक सतीश फुके यांनी केली.
Rokhthok News

Previous articleकार व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी
Next articleपावसाचा जोर वाढला, सतर्कतेचे आवाहन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.