Home Breaking News घातक…अवैद्य दारू विक्रीला पाठबळ कुणाचं..!

घातक…अवैद्य दारू विक्रीला पाठबळ कुणाचं..!

● अवैद्य दारू विक्रेत्यांना नेमकं पाठबळ कुणाचं हे समजण्याइतपत जनता खुळी नाही.

654

उत्पादन शुल्क विभाग सुस्त

Wani news | वणी उप विभागातील ग्रामीण भागात देशी विदेशी दारू सहज उपलब्ध होत आहे. दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना अवैद्य दारू विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करताना दिसत नाही. अवैद्य दारू विक्रेत्यांना नेमकं पाठबळ कुणाचं हे समजण्याइतपत जनता खुळी नाही. तालुक्यात खऱ्या अर्थाने उत्पादन शुल्क विभागाचीच ‘चंगळ’ असल्याचे बोलल्या जात आहे. Excise department does not seem to be taking concrete action against illegal liquor sellers without any license to sell liquor.

उत्पादन शुल्क विभागाचा मनमानी कारभार तालुक्यात सुरू असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. अनुज्ञप्ती धारक बेभान झाले आहेत. बेधुंद वागण्यासाठी त्यांना संबंधित विभागाची मौखिक परवानगी तर मिळाली नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. संबंधित विभागाचे कठोर नियम कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

तालुक्यातील बहुतांश गावात देशी-विदेशी दारूचा पुरवठा होत आहे. किरकोळ दारू विक्रीचे अनुज्ञप्ती धारक होलसेल दारू विक्रेते झाले आहेत. हजार- दीड हजार लोकवस्तीच्या गावात पन्नास-साठ पेट्या दारूची होणारी विक्री डोके चक्रावणारी आहे. म्हणजे गावातील अबालवृद्धापर्यंत सर्वच मद्यपान करणारे आहेत का ? हे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील गाव-खेड्यात, आदिवासी बहुल ग्रामीण भागात देशी-विदेशी व हातभट्टी ची दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. पोलीस प्रशासन अवैद्य दारू विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करताहेत मात्र ज्या विभागाच्या अखत्यारीत हा प्रकार येतो तेच गप्पगुमान का हे तपासण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे.

Dry day is the better day
उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून “ड्राय डे”च्या दिवशी तालुक्यात ठीक ठिकाणी सहजच देशी-विदेशी दारू उपलब्ध होते. याकडे जाणूनबुजून संबंधित विभाग दुर्लक्ष करतो का ? हे न उलगडणारे कोडे आहे. मात्र “Dry day is the better day” असं मद्यपी स्वतःशीच पुटपुटताना दिसतो हे मात्र खरं.
ROKHTHOK NEWS