Home क्राईम प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त

● स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) कारवाई

1673

स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) कारवाई

Wani News | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ढाकोरी बोरी मार्गे शिरपूर कडे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची खेप येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे आबई फाटा परिसरात सापळा रचला. संशयित वाहनांची झाडाझडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेत साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दि. 25 जुलै ला रात्री करण्यात आली. A team of the local crime branch received confidential information that a consignment of banned flavored tobacco was coming to Shirpur through Dhakori Bori.

प्रविण अंबादास गोहकार (39) असे ताब्यातील वाहनचालकाचे नाव आहे, तो येथील शास्त्री नगर परिसरात वास्तव्यास आहे. वणी परिसरात प्रतिबंधित तंबाखूची तस्करी जोरात सुरू आहे. पोलीस कारवाया करत असले तरी तस्कर मात्र जुमानताना दिसत नाही. तेलंगना राज्यातून मोठया प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूची तस्करी होत असल्याचे या करवाईवरून उजागर झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बतमीदाराने प्रतिबंधित तंबाखूची खेप ढाकोरी बोरी मार्गे शिरपूर कडे येणार असल्याची “बित्तंबातमी” दिली. यावरून आबई फाटा परिसरात सापळा रचला. पांढ-या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इर्टीका कार क्रमांक MH -34 -AM- 2520 या वाहनांची तपासणी केली असता प्रतिबंधित तंबाखू आढळून आला.

कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मजा सुगंधीत तंबाखु 200 ग्राम क्षमतेचे 240 नग डबे, ईगल हुक्का शिशा सुगंधीत तंबाखुचे 200 ग्राम क्षमतेचे 40 नग, चार मिनार 333 सुगंधीत तंबाखुचे 30 नग व वाहन चालकाचा मोबाईल तसेच मुद्देमाल वाहून आणण्यासाठी वापरात आणलेले वाहन असा एकुण 8 लाख 47 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादी वरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक स्थागुशा आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, चालक नरेश राउत यांनी केली.
Rokhthok News