Home Breaking News अनर्थ टळला…लाठीवाला पेट्रोल पंप लगत वीज पडली

अनर्थ टळला…लाठीवाला पेट्रोल पंप लगत वीज पडली

9010

धुव्वाधार पाऊस आणि विजेचा थयथयाट

Wani News | वणी शहरात दुपारी चार वाजताच्या दरम्यान धुव्वाधार पाऊस कोसळला आणि त्यातच विजेचा थयथयाट धडकी भरवणारे होते. शहरात मुख्य ठिकाणी असलेल्या लाठीवाला पेट्रोल पंप लगत असलेल्या संरक्षक भिंती जवळील झाडावर वीज पडल्याची घटना घडली. यामुळे लगतच असलेल्या जनरेटर ने पेट घेतला. A tree near the Lathiwala petrol pump was struck by lightning

तहसील, न्यायालय, पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या लाठीवाला पेट्रोल पंप लगत वीज कोसळली. तिथे पेट्रोल साठवणुकीची जागा सुध्दा आहे तर बरेचशे ग्राहक पेट्रोल घेण्यासाठी येत असतात. पाऊस पडत असल्याने बरेचशे नागरिक पेट्रोल पपंच्या शेड खाली उभे होते.

झाडावर वीज पडताच एकच धांदल उडाली मात्र यावेळी तिथे ठेवलेल्या जनरेटर ने पेट घेतला यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे परंतु कोणालाही इजा झाली नाही. काही फूट अंतरावर वीज पडल्याने मोठा अनर्थ टळला हे मात्र निश्चित.
Rokhthok News