Home Breaking News तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला

● आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

3148

आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

Wani Rain update | जिल्ह्यात संततधार पाऊस पडतो आहे, प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला असून नदी नाल्या दुथडी भरून वाहताहेत. वर्धा नदीला पूर आला असून तालुक्यातील नदी काठावर असलेल्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधील बचाव पथकाचे चार जण वणीत दाखल झाले असून प्रशासन सज्ज झाले आहे. Wardha river has flooded and five villages have been cut off.

तालुक्यातील भुरकी, सेलू, कवडशी, चिंचोली व सावंगी (नवीन) असे संपर्क तुटलेल्या गावांची नावे आहेत. स्थानिक प्रशासनाने नदीकाठावरील गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ग्रामस्थांनी निरुत्साह दाखवला.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. वर्धा नदीला पूर आलेला आहे तसेच धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नदी काठावरील गावे बाधित होऊ शकतात म्हणूनच प्रशासनाने आवाहन केले होते. सद्यस्थितीत आपत्ती व्यवस्थापन व तलाठी बचाव कार्यासाठी सज्ज झाले आहेत.

संपर्क तुटलेल्या गावातील परिस्थिती बिकट झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोट तैनात करण्यात आली आहे तर लगतच्या गावातील शाळा, शेड आदी ठिकाणी कॅम्प लावण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Rokhthok News