Home Breaking News Rain update…वर्धा नदी फुगली, सात गावांना फटका

Rain update…वर्धा नदी फुगली, सात गावांना फटका

● निम्न वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग ● नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

2373

निम्न वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Red Alert news | हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट ( Red Alert ) जाहीर केला आहे. जिल्ह्यात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातुन गुरुवारी रात्री 08:45 वाजतापासून 19 दरवाजातून 506.37 घन.मी. से. पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे वर्धा नदीकाठावरील गावांना फटका बसणार असून सद्यस्थितीत तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. Bhurki, Chincholi, Sawangi, Shelu (Khu), Shivni Jahgir, Jugad, Sakhra villages in the taluka have lost contact.

wani 1

तालुक्यातील भुरकी, चिंचोली, सावंगी, शेलू (खु), शिवनी जहागीर, जुगाद, साखरा या गावांचा संपर्क तुटला आहे. निम्न वर्धा प्रकल्पातून रात्री पासून पाण्याचा विसर्ग होत आहे. 506.37 घन.मी.से. पाणी वर्धा नधी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे.

wani 2

अपर वर्धा, लोअर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढत आहे यामुळेच पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदी काठावरील गावे पुराच्या पाण्याने वेढल्या जाऊ शकतात म्हणूनच प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले होते. नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ग्रामस्थांनी निरुत्साह दाखवला.

wani 3

तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावातील परिस्थिती बिकट झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. बचाव पथक वणीत दाखल झाले आहे. बोट तैनात करण्यात आली आहे, तलाठी, मंडळ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Rokhthok News