Home Breaking News भयावह…वर्धा नदीवरील नवीनतम पुलाला गेले तडे

भयावह…वर्धा नदीवरील नवीनतम पुलाला गेले तडे

● थातुरमातुर डागडुजी, अपघाताला निमंञण

5852

थातुरमातुर डागडुजी, अपघाताला निमंञण

Wani News | वर्धा नदीवरील पटाळा जवळचा जुना वाहतुकीचा पुल पाडण्‍यात आला आहे. तर नव्‍यानेच बांधण्‍यात आलेला पूल काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. त्याच नवीनतम पुलाला तडे गेले आहेत. भेगा पडल्‍याने वाहतुक वळवण्‍यात आली आहे. यामार्गावर मोठया प्रमाणात वर्दळ असते, खचलेल्‍या पुलामुळे मोठया अपघाताची शक्‍यता निर्माण झाली असुन प्रशासन माञ कुंभकर्णी झोपेत आहे. The newly constructed bridge has collapsed at some places while the traffic has been diverted due to cracks in the bridge.

वर्धा नदीवरील पूल 2

राज्‍यात रस्‍ते अपघाताची श्रृखंला सुरु आहे, होत असलेले बांधकाम दर्जेदार होतांना दिसत नाही. अवघ्‍या एक वर्षा पुर्वी बांधण्‍यात आलेल्‍या वर्धा नदीवरील पुलाला भेगा पडल्‍या व काही भाग खचल्‍याचे निदर्शनांस आले आहे. खचलेल्‍या भागावर मलमपटटी म्‍हणुन चुरी टाकण्‍यात आली आहे.

वर्धा नदीवरील पटाळा येथे बांधण्‍यात आलेल्‍या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. यवतमाळ व चंद्रपुर जिल्ह्याला जोडणारा हा पुल आहे. नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली  यामार्गावरुन राज्‍य मार्ग परिवहन विभागाच्‍या शेकडो बसेस धावतात. तर खनिज आणि गौण खनिजांची अवजड वाहनातुन होणारी वाहतुक हजारो वाहनांच्‍या माध्‍यमातुन होत असते.

पावसाळ्याच्या दिवसात कोकणातील साविञी नदीवरील पुल सुध्‍दा असाचं राञी कोसळला होता त्‍यात संपुर्ण बसच वाहुन गेल्‍याची घटना अद्याप विस्‍मरणात गेलेली नाही. तशाच स्‍वरुपाची या नवीनतम पुलांची अवस्‍था असुन प्रशासनाने तातडीने तो मार्गच बंद करावा जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

प्रशासनाने काही ठिकाणी बॅरेकेटस लावुन वाहतुकीवर नियंञण आणले आहे. परंतु अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुक सुरू करण्यात आलेल्या पुलाला चक्क तडा गेल्याने बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. या पुलाचे मूल्यांकन वरिष्ठ पातळीवर होणे गरजेचे झाले आहे.

नव्‍यानेच बांधलेला पुल धोकादायक
वर्धा नदीवर पटाळा येथे नव्‍यानेच बांधण्‍यात आलेल्‍या पुलांला भेगा पडल्‍या आहेत तर काही भाग खचला आहे. कंञाटदाराने संबधीत पुल योग्‍यरित्या बांधलेला आहे का हे तपासण्‍याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे. या ठिकाणी अनुचित घटना घडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुलाचे बांधकाम करणारे कंञाटदार व संबंधीत अधिकारी यांचेवर आत्‍ताच कारवाई होणे गरजेचे आहे. 
Rokhthok News