Home Breaking News जनआक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेची धडक

जनआक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेची धडक

● मनसे नेते राजू उंबरकर यांचे नेतृत्व

798

मनसे नेते राजू उंबरकर यांचे नेतृत्व

MNS News Yavatmal |
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत, तात्काळ नुकसानभरपाई द्यावी ही मागणी रेटून धरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 31 जुलै ला सकाळी 11 वाजता जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. Jan Akrosh Morcha led by Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar.

सोमवारी सकाळी टिळक स्मारक मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. या जनआक्रोश मोर्चात जिल्हयातील शेतकरी बांधव, सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ताधाऱ्यांची नेमकी भूमिका काय ?
जिल्ह्यातील आठ आमदार सत्ताधारी पक्षांचे आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा कोणी वालीच नसल्याची भावना सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्यात निर्माण झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागात सुध्दा हाहाकार माजला होता. घरे व गृहउपयोगी वस्तू, साहित्याचे मोठे नुकसान झालेत. मात्र सत्ताधारी पीडितांच्या सांत्वनापुढे सरकले नाहीत. यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिथे उंबरकर तिथे जनसागर
मनसेचे आंदोलन, मोर्चे आक्रमक व प्रशासनाला धडकी भरवणारे असल्याचे आजपर्यंत सिद्ध झाले आहे. अतिवृष्टीमुळे पीडित शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठी काढण्यात येणारा “जनआक्रोश मोर्चा” भव्य असणार आहे. कोणतेही निकष न लावता तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लावून धरण्यात आली आहे यामुळे प्रशासन दखल घेणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Rokhthok News

Previous articleत्या ….भीषण अपघातात दोघे ठार
Next articleलालगुडाच्या सरपंचपदी ‘गीता उपरे’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.