● मारेगांव तालुक्यातील घटना
Sad News | मारेगांव तालुक्यातील अनंतपुर (सुरला) या गावात वास्तव्यास असलेल्या 33 वर्षीय तरुणांने शेतातच विषाचा घोट पोटात रिचवत आपले आयुष्य संपवले. ही घटना मंगळवार दिनांक 1 ऑगष्टला सायंकाळी घडली. He had gone to the farm as usual. There he drank poisonous liquid.
मनोज जगन पाचभाई (33) असे मृतकांचे नांव आहे तो मारेगाव तालुक्यातील अनंतपुर (सुरला) येथील निवासी होता. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. तेथे त्याने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब लगतच्या शेतातील नागरीकांना समजताच त्यांनी नातेवाईक व पोलीसांना सुचित केले.
घरच्या मंडळीनी शेताकडे धाव घेत मंगळवारी राञी मनोज ला तातडीने ग्रामीण रुग्णांलयात उपचारार्थ दाखल केले माञ डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. बुधवारी त्याचे शव विच्छेदन करण्यात आले असुन नातेवाईकांना मृतदेह सोपविण्यात आला आहे. त्याने आत्महत्या का केली हे अदयाप स्पष्ट होवू शकले नाही.
Rokhthok News