Home Breaking News विकासकामांचा धडाका… वर्षभरात खेचून आणले 30 कोटी

विकासकामांचा धडाका… वर्षभरात खेचून आणले 30 कोटी

● नुकताच 10 कोटीचा निधी मंजुर ● शहरातील अंतर्गत रस्‍ते होणार कॉक्रीटचे

1082

नुकताच 10 कोटीचा निधी मंजुर
शहरातील अंतर्गत रस्‍ते होणार कॉक्रीटचे

| development news wani |
वणी शहरातील महत्‍वपुर्ण अंतर्गत रस्ते आता काँक्रीटीकरण होणार आहेत. अवघ्‍या एक वर्षात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नगर विकास विभागाच्‍या माध्‍यमातुन नागरी सेवा व सुविधेच्या कामाकरिता तब्‍बल 30 कोटी रुपये निधी खेचुन आणला. तर नुकताच 10 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असुन यातील साडेतीन कोटी मारेगांवला रस्‍ते विकासाकरीता देण्‍यात आला आहे. In one year, MLA Sanjeevreddy Bodkurwar pulled a total of Rs 30 crore for road development work.

आ. बोदकुरवार यांनी रस्‍ते विकास कामांचा धडाका लावला आहे. याकरीता घवघवीत निधी खेचुन आणला आहे. जुलै महिन्‍यात शासन निर्णयानुसार 10 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला तर यापुर्वी 20 कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त झाला होता. त्‍या सर्व कामांना तांञीक मंजुरात मिळाली असुन कामे युध्‍दस्‍तरावर सुरु झाली आहेत.

टिळक चौक ते रंगनाथ स्‍वामी मंदिर व टूटी कमान ते काठेड ऑइल मिल पर्यंत चे रस्‍ता सिमेंट काँक्रीटीकरण होत आहे. शनिवारी आ. बोदकुरवार यांनी यामार्गाची स्‍वतः पाहणी केली आणि स्‍थानिकांसोबत चर्चा करुन दर्जेदार रस्‍ता निर्मिती व्‍हावी याकरीता अधिकारी व कंञाटदाराला आदेशीत केले आहे.

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजतेअंतर्गत वणी नगरपरिषदेला नुकतेच मंजुर झालेल्‍या साडे सहा कोटी रुपयांच्‍या निधीतुन सिमेंट रस्‍ता काँक्रीटीकरण होणार आहे. यामध्‍ये पदमावती नगरी मधील सिमेंट रस्ता, लादीकरण व नाली बांधकाम एक कोटी 90 लाख रुपये, वणी वरोरा मार्ग ते गंगशेटटीवार मंगल कार्यालय 20 लक्ष रुपये, विघ्‍या नगरी मधील अंतर्गत रस्‍ता डांबरीकरण, लादीकरण व नाली बांधकाम 90 लक्ष, टिकक चौक ते एसपीएम शाळे पर्यंत सिमेंट रस्ता, लादीकरण व नाली बांधकाम एक कोटी 10 लक्ष, बस स्‍थानक ते ग्रामीण रुग्‍णांलय सिमेंट रस्ता, लादीकरण व नाली बांधकाम एक कोटी 20 लक्ष, विठठलवाडी मधील सिमेंट रस्‍ता व लादीकरण एक कोटी 20 लक्ष असे कामे होणार आहेत.

नगर पालीकाशाळेचा दर्जा वाढविण्‍याचा संकल्‍प

IMG_20230813_143220

नगरविकास विभागातून विविध विकास कामाकरिता निधी खेचून आणल्यानेच शहर विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील उद्याने, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, नाट्य संकुल पुर्णत्‍वास आले आहे. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत शहरातील संपुर्ण अंतर्गत रस्‍ते कॉक्रीटीकरण करण्‍याचा मानस असुन नगर पालीका शाळेचा दर्जा सर्वोत्‍तम व खाजगी शाळे प्रमाणे असावा असा संकल्‍प असल्‍याचे आ. बोदकुरवार यांनी स्‍पष्‍ट केले.

Rokhthok News