Home Breaking News धक्‍कादायक….. वर्धा नदीत दोघे तरुण वाहून गेले

धक्‍कादायक….. वर्धा नदीत दोघे तरुण वाहून गेले

●पोलीस घटनास्‍थळी रवाना, शोध सुरु

6756

पोलीस घटनास्‍थळी रवाना, शोध सुरु

Sad News | तालुक्‍यातील नायगांव शिवारात सात ते आठ युवक लगतच असलेल्‍या वर्धा नदीवर आंघोळीला गेले होते. यातील दोघे वाहून गेल्‍याची दुर्देवी घटना मंगळवार दिनांक 15 ऑगष्‍ट ला दुपारी घडली. An unfortunate incident took place on Tuesday when two people who had gone to bathe in the Wardha river were washed away

प्रविण सोमलकर (36) रा. चंद्रपूर व दिलीप कोसुरकर (40) रा नायगाव असे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. प्रवीण हा नायगाव येथील जावई होता सुट्टीमुळे तो नायगाव येथे आला होता.

नायगाव येथील मित्रमंडळींनी सुट्टीत मौजमजा करण्याचा बेत आखला होता. यामुळे 7 ते 8 तरुण लगतच असलेल्या वर्धा नदीवर पोहचले. जलतरणाचा आनंद घ्यावा म्हणून ते नदीपात्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे प्रवाहात वाहून गेले.

या अनपेक्षित घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली, पोलिसांना सूचित करण्यात आले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करताहेत.
Rokhthok News

ही बातमी सुद्धा वाचा…..

घातवार….पुन्‍हा वर्धा नदीत दोघे गेले वाहून

Previous articleशिवसेनेचे अनोखे आंदोलन, प्रबोधन आणि रक्‍तदान
Next articleअनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.