● निळापूर शिवारातील घटना
Accident News Wani | तालुक्यातील निळापूर येथे वास्तव्यास असलेल्या 56 वर्षीय व्यक्तीला भरधाव ट्रकने उडवले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 16 ऑगस्टला रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. A 56-year-old resident of Nilapur was crushed by a speeding truck
विनोद वारलु काळे (56) असे मृतकाचे नाव आहे, ते निळापूर येथील निवासी होते तर सुहास आत्राम (40) हे जखमी झाले आहेत. घटनेच्या दिवशी रात्री ते दोघे गावालगतच्या मार्गावरून शौचास जात होते. त्याचवेळी वणी कडून निळापूर च्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक (MH- 40 -CD- 6635) ने दोघांना धडक दिली.
भरधाव ट्रकच्या धडकेत विनोद चिरडल्या जाऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले तर सुहास गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रक चालक गुलाबी नशेत असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले तसेच जखमीला उपचारार्थ हलवण्यात आले आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, मुलगा, भाऊ असा आप्तस्वकीय परिवार आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News