Home Breaking News सर्वसामान्यांचे सोडा…आमदारांच्या घरासमोरील पथदिवे बंद

सर्वसामान्यांचे सोडा…आमदारांच्या घरासमोरील पथदिवे बंद

● पालिका प्रशासन चांगलेच निर्ढावले

666

पालिका प्रशासन चांगलेच निर्ढावले

● सुनील पाटील :
वणी शहरात पालिका प्रशासन कार्यान्वित आहे की नाही असा प्रश्न आता वणीकर नागरिकांना पडला आहे. पालिका अनेक समस्यांचे माहेरघर झाल्याचे दिसत असून कंत्राटदार पालिकेचा गाडा चालवताहेत की काय असे वाटायला लागले आहे. सर्वसामान्यांचे सोडा… चक्क आमदारांच्या घरासमोरील पथदिवे बंद असल्याने पालिका प्रशासन चांगलेच निर्ढावले हे स्पष्ट होत आहे. As the street lights in front of the MLA’s house are switched off, it is clear that the municipal administration is well prepared.

शहरात चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे, पथदिवे बंद ठेवून पालिका प्रशासन आपली दिवाळखोरी जगजाहीर करताहेत. शहरात विविध समस्यांनी बाजार मांडला आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करताहेत.

पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचे हे द्योतक आहे. कंत्राटदार आणि अधिकारी नागरिकांना वेठीस धरत आहे. सर्व सुरळीत असले की, सर्वांचे चांगभले आणि खटकले की लाच लुचपत विभागाची कारवाई हे नागरिकांना चांगलेच ज्ञात आहे. विद्यमान आमदारांनी पालिका प्रशासनाला आता तरी जाब विचारणे गरजेचे झाले आहे.

मागील काही दिवसापासून शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभागातील पथदिवे बंद असल्याने चोरट्यांना आयती संधी मिळत आहे. शहरात प्रत्येक प्रभागातील पथदिवे रात्री सुरू ठेवल्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसणार आहे. पथदिवे बंद ठेवण्यामागे पालिकेचा उद्देश काय हे स्पष्ट होणे गरजेचे असून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई अपेक्षित आहे.
Rokhthok News